लेख – सह्याद्री देवराई

सह्याद्री देवराई
मार्गदर्शक व प्रेरणा : मा. सयाजीराव शिंदे
सह्याद्री देवराई संकल्पना राबविणारी संस्था : “ निसर्ग जागर प्रतिष्ठान ”
संकल्पना : डॉ. महेश गायकवाड : मो. ९९२२४१४८२२

एक जगप्रसिद्ध अभिनेता म्हणून आपण सयाजीराव शिंदे यांच्याकडे पाहताना आजच्या सामाजिक व पर्यावरण चळवळीकडे पाहताना त्यांचा विशेष सह्भाग दिसून येतो कारण त्यांना पर्यावरण या विषयाची प्रचंड आवड आणि अभ्यासपूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे राबविण्यासाठी ते सतत आग्रही असतात. मी पाहिलेला हा अभिनेता इतका पर्यावरण अभाय्सक आहे कि जैवविविधतापूरक झाडे लावण्याचा मानस त्यांनी केला आणि त्याची सुरुवात माण तालुक्यातील चार गावातून केला यात दिवडी , कोळेवाडी, गोडसेवाडी, पांढरवाडी या गावात अगदी सहज ५०००० पेक्षा जास्त झाडे दिली शिवाय लोकांना प्रेरित करून असंख्य देशी झाडांच्या बिया लावण्यास प्रारंभ केला. सर्वात म्हत्वाचे म्हणजे आपल्या आईची तुला बियाच्या वजना बरोबर करून त्या सर्व बिया या चार गावात लावल्या.

सह्याद्री देवराई हि कल्पना राबविणारे व सर्व प्रकारचे आर्थिक मदत करणारे फक्त सयाजीरावच असू शकतात हे मी या देवराई प्रकल्पाच्या निमिताने पहिले. आतापर्यंत देवराईसाठी झालेला सर्वच खर्च फक्त सयाजीराव यांनी केलेल्या आहे.
सयाजीराव नेहमी सागतात कि, आई आणि झाडं एकसमान असतात कारण आईप्रमाणे झाडेही आपल्या संपूर्ण जीवनात फक्त दुसर्याला देत असतात आपल्याकडून काहीच अपेक्षा न करता…
सयाजीराव शिंदे यांनी सर्वाना जाहीरपणे आश्वासन केले कि अश्या प्रकारच्या स्थानिक देवराई निर्माण करणेसाठी शासन आणि काही संस्थानी मिळून भारतभर केल्या पाहिजेत त्यामुळे आपले वन्यजीव वाचतील आणि आपला शेतकरी…
हा फक्त आदेश सोडून काम करणारा कलाकार नसून आपला माणसासारख स्वत तीन तीन दिवसरात्र काम करणारा माणूस असून, हे स्वत खूप राबतात हे महाराष्ट्राने पहिले आहे. हा मातीतला माणूस असून, मातीला काय पाहिजे ते देणारा.

ऑक्शिजन कुठल्याही कंपनीत तयार होत नसून ती फक्त झाडेच देत असतात. त्यामुळे आपल्या आयष्यात किमान एक तरी झाड लावा आणि ते जगवा…तसेच ते झाड लावताना आपल्या भागातील व देशीच झाड लावा जेणेकरून ते आपल्याबरोबर इतर सर्व महत्वाच्या जीवांना जगवेल….
देवराई हि संकल्पना फार प्राचीन असून गावागावातून अतिशय महत्वाचे जीवनदायी वृक्ष देवळाच्या परिसरात आवर्जून लावले जायचे आणि त्यांची निगा व संरक्षण गावकरी करायचे. तसेच एखादा वृक्ष स्वतःसाठी अथवा गावासाठी तोडायचा झाल्यास, अगोदर देवाला कौल लावायचे व कौल मिळाला तरच तोडत असत. आता मात्र देवराया गेल्या मानवाने आपल्या हव्यासापोटी सर्व देवराया तोडल्या. कुणीही त्याच पुनर्वसन केल नाही. आज महाराष्ट्रात काहीच गावात देवराया अस्तित्वात आहेत.
हाच धागा पकडून “ निसर्ग जागर प्रतिष्ठानने ” देवराया निर्माण करण्यासाठी “सह्याद्री देवराई” असा प्रकल्प हाती घेऊन महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार करण्याचे ठरवले आहे. या प्रत्येक देवराई मध्ये प्रती एकर एक दगडी चौथरा बांधून वड, उंबर, पिंपळ अश्या कल्पवृक्षाचा पार अथवा दगडी चौथरा निर्माण करून देवराई स्थापना करायचे ठरवले आहे. महाराष्ट्रातील पहिली १५० एकर परीसरातील देवराई दिवडी ता. माण जि. सातारा येथे “सह्याद्री देवराई” या नावाने निर्माण करण्याचे काम ११ जून २०१६ रोजी सुरु केले आहे. यापुढील काळात स्थानिक गावकरी व निसर्ग जागर प्रतिष्ठान मिळून अनेक गावात हा प्रकल्प करण्याचा मानस आहे.
आदरणीय सयाजीराव शिंदे यांचे निसर्ग विषयी प्रेम व भावना पाहून डॉ. महेश गायकवाड यांनी सयाजीराव शिंदे यांना आर्या बाग काटेवाडी येथे भेटून, आपण प्रत्येक गावोगावी देवराई स्थापना करूयात हि संकल्पना मांडली. गाव तिथ देवराई हि संकल्पना सयाजीराव यांना खूपच आवडली. मात्र यात फक्त स्थानिक झाडे लावली पाहिजेत याविषयी सखोल माहिती दिली. तसेच आपण हि देवराई संकल्पणा महाराष्ट्रभर राबवू असेही त्यांनी बोलून दाखविले.

अर्थातच हा संकल्प म्हणजेच : देवासाठी राखीव ठेवलेले वन अर्थात “सह्याद्री देवराई” अर्थात मानवाबरोबर वन्यजीव यांचे संरक्षण होणे काळानुसार गरजेचे आहे हि बाब अतिशय महत्वाची आहे. यासाठी गावातील पडीक जमीन, वन विभागाची जमीन किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीची अथवा खाजगी असलेली जमीन सर्वानुमते देवराई निर्माण करणेसाठी घ्यावी.
भारतात जवळपास १४००० पेक्षा जास्त देवराई आहेत. मात्र यापैकी कोकण व सह्याद्री डोंगर रांगामध्ये पुणे, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रभर १६०० पेक्षा जास्त नैसर्गिक देवराई आहेत. यात अगदी १ हेक्टर ते ५० हेक्टर क्षेत्रापर्यंत पसरलेल्या देवराई आढळून येतात. या देवराईत जैवविविधता विपुल प्रमाणात दिसून येते. यात अनेक प्रकारची झाडे, वेली, औषधी वनस्पती, विविध गवताचे प्रकार आढळतात. यात अनेक पक्षी, प्राणी, सरपटणारे तसेच इतर वन्यजीव देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. यात नैसर्गिकरीत्या वन्यजीव व वनस्पतीचे संरक्षण व संवर्धन होते. तसेच गावातील पर्यावरण निरोगी व स्वच्छ ठेवण्याचे काम देखील या देवराई मुळे होत असते. वातावरण स्वच्छ व निरोगी ठेवत असल्यामुळे मानवाच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय पोषक असे ठिकाण म्हणजे हि देवराई ठरेल.
यात नैसर्गिक रित्या झाडे वाढत असल्यामुळे स्थानिक जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळून येत असते. यात कोणतेही परदेशी झाडे नाहीत, हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जाणवतो . हाच धागा पकडून आपण सह्याद्री देवराई उभा करीत असताना, कोणतेही परदेशी अथवा उपयोगी नसलेली झाडे गावात लावणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करीत आहोत.
यात मुख्य म्हणजे वर्षभर जिवंत पाण्याचे झरे आढळून येतात. पाणी हा घटक यातील सर्वाना जीवनदायी ठरत असल्यामुळे, अश्या प्रकारची देवराई प्रत्येक गावात असणे यापुढील काळात अतिशय गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे भारतातील सर्वच गावात अश्या प्रकारच्या सह्याद्री देवराई होणे काळानुसार गरजेचे ठरेल…
हा प्रकल्प राबवीत असताना आपल्या परिसरात नैसर्गिकरित्या वाढणारी झाडे, गवत, झुडपे लावावीत. आपल्या गावातील उपयोगी व किफायतशीर झाडे लावणे हा यातील मुख्य उद्देश असेल हे विसरून चालणार नाही. यात परदेशी व उपयोगी नसलेली झाडे लावू नयेत.
किफायतशीर झाडे म्हणजेच आंबा, चिंच, वड, उंबर, नांद्रूक, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, करंज, मोह, बेल, साधी बाभूळ, भोकर, करवंद, पळस , पांगारा, कवठ, काटेसावर अशी झाडे लावावीत. तसेच सीताफळ, बोर, रामफळ, लिंबू , हदगा, आवळा, कडीपत्ता, शेवगा, अशी फळझाडे लावावीत .
याशिवाय आपल्या परिसरातील अजून काही विविध उपयोगी झाडे जास्त लावल्यास आपला परिसर पर्यावरणपूरक होण्यास मदतच होईल. यात शमी, नागचाफा, बेहडा, हिरडा बकूळ अशी झाडे लावल्यास सर्व जीवांना फायदा होईल.
देवराई पुनर्निर्माण हा एक पर्यावरण संवर्धनाचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत. यात छायादार वृक्षांच्या पारावर बसून ध्यान, जप, तप, चिंतन व विचारविनिमय करायला खूपच प्रसन्न वाटेल. परिसरातील पक्षी, प्राणी यांनाही नवीन आसरा मिळेल. असा हा देवराई प्रकल्प प्रत्येक गावोगावी साकारला जावा अशी अपेक्षा आम्ही करीत आहोत.
तसेच यात वन्यजीवपूरक व पाणीसाठे वाढविणारी झाडे, गवत, लावणे आवश्यक आहे. या सर्वासाठी गरज आहे ती फक्त सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून हि लोकचळवळ यशस्वी करण्याची.
यासाठी मा. सयाजीराव शिंदे आणि निसर्ग जागर प्रतिष्ठान या देवराई प्रकल्प उभारणीसाठी शाश्वत व आर्थिक मदत करेल. मात्र यासाठी शासकीय, गावकरी व इतर ठिकाणाहून मदत घेण्यासाठी गावकरी सर्वानुमते मदत करतील. यासाठी परदेशी मदत घेण्यासाठी हि प्रयत्न करणार आहोत. या प्रकल्पातील निधी फक्त देवराई उभारानिसाठीच केला जाईल हि नोंद घावी आणि सर्व व्यवहार निसर्ग जागर करेल. यासाठी सर्व मदत निसर्ग जागर प्रतिष्ठान या नावे घेण्यात येईल हि नोंद घ्यावी. गावनिहाय प्रकल्पासाठी गावातील २ व्यक्तीचा समावेश करण्यात येईल आणि त्यांच्याद्वारे सर्व माहिती दिली जाईल.

इतर आवश्यक बाबी मध्ये खालील गोष्टी आवश्यक:
१) देवराई मध्ये फक्त स्थानिक झाडेच असतील.
२) कुऱ्हाडबंदी व चराईबंदी : देवराई मध्ये वृक्षतोड करण्यास तसेच जनावरांना चरण्यास पूर्णः बंदी असेल.
३) गायरान किंवा ग्रामपंचायतीची जमीन किंवा खाजगी जमीन
(किमान १ हेक्टर ते ५०० हेक्टर असावी)
३) दानशूर वर्गणीदार तसेच लोकवर्गणी आवश्यक
४) देवराई च्या प्राथमिक उभारणीवेळी पाण्याची आवश्यकता करणे, त्यासाठी शेततळे अथवा विहीर असणे अत्यावश्यक आहे
देवराईचे काही महत्वाचे फायदे:
१) वृक्षारोपण व पावसाच्या पाण्याचे जलव्यवस्थापन केल्यामुळे गावाला व परिसराला बारमाही पाणी मिळेल.
२) स्थानिक पक्षी, प्राणी व इतर सर्वाना नैसर्गिक अधिवास मिळून परिसरातील पर्यावरण स्वच्छ व निरोगी राहण्यास मदत होईल
३) तसेच देवराई प्रकल्पासोबत नैसर्गिक घटकांचा योग्य प्रमाणात वापर करून रोजगार निर्मिती सुद्धा शक्य आहे. ज्यामध्ये मधुमक्षिका पालन, डिंक व इतर पदार्थ गोळा करणे, काही क्षेत्रावरील फळांची विक्री इत्यादी शक्य आहे.
४) सारवलेले चौथरे : प्रती एकरी १ चौथरा असणे आवश्यक आहे.
५) देवराई साठी प्रती एकर रु. १.५ लाख खर्च अपेक्षीत आहे.

देवराई मधील वृक्ष लागवड केल्यानंतर जवळपास ३ वर्षे जोपासना करणे गरजेचे आहे. त्याकरिता गावातील सर्व नागरिक व काही संस्था यांची मदत अपेक्षित असते कारण ३ वर्षे यांचा सांभाळ करणे खूप कष्टाचे काम असून लोकसहभाग व शासन सहभाग असणे गरजेचे आहे. यासाठी सयाजीराव शिंदे यांनी सर्वाना एकीचा मंत्र देऊन आज हि देवराई खूपच चांगली उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. यात १ टक्के पेक्षा हि कमी झाड मरत असल्यचे दिसून आले. शिवाय येत्या १६ ऑगस्ट ला श्रमदान करण्यात येणार असून यासाठी स्वता साय्जीराव शिंदे दिवसभर उप्स्तीत राहणार आहेत.
प्रत्येक गावात अशी स्थानिक व उपयोगी झाडे लावून देवराई निर्माण झाल्यास भविष्यात गावांना काहीच कमी पडणार नाही अशी निसर्ग साखळी निर्माण होएइल. दिवडी ता. माण यांनी पहिली मानव निर्मित देवराई करण्याचा माण मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *