Drought/Flood Relief Fund

पूरग्रस्त व दुष्काळासाठी – मदत कार्य

मदतीचा प्रकार ठिकाण काय मदत दिली
दुष्काळ मदत बीड – २०१५ शेतकरी मदत –
२५ गरजू शेतकऱ्यांना प्रत्येकी रु. ५,०००/- प्रमाणे, १,२५,०००/-मदत देण्यात आली.  
  माण – २०१५ चारा छावणी- साधारणपणे २५,०००/- रक्कमेचा चारा देण्यात आला.
  माण – २०१७ जल संधारण- गाडेवाडी ता. माण, रु. २०,०००/- मदत देण्यात आली.
  गाडेवाडी – २०१७ जल संधारण – थदाळे ता. माण येते १०० आंबे, व चारा छावणी साठी रु. ३५,०००/- मदत देण्यात आली.
महापूर मदत सांगली-सातारा-कोल्हापूर घालवड ता. शिरोळ आणि मोरेवाडी ता. जावळी, समाजकार्य मदत व आरोग्य निधी – यासाठी रु. २,१०,०००/-  (दोन लाख, दहा हजार फक्त)

खचलेले गाव आणि चिवट मावळे
सातारा तालुक्यांतील जावळी खोऱ्यातील मोरेवाडी हें गाव अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे . ठोसेघर धबधब्याच्या रस्त्याने परंतु बरेच पूढे आणि साध्या कच्च्या रस्त्याने चढ चढत या गावात पोहचावे लागते . जाताना जिकडे तिकडे पवन चक्क्याचे जाळे इथल्या डोंगरावर पहायला मिळते .या पवन चक्क्यासाठी अत्यंत दुर्गम ठिकाणी पण केलेले छोटे कच्चे रस्ते इथे पहायला मिळतात . जिथे तिथे खोदलेले डोंगर सुद्धा दिसतात . आत्ता आलेल्या महापूराच्या वेळेस या गावाकडे जाणारा रस्ता खचला होता त्यामुळे आणि एवढ्या उंचावर व दुर्गम ठिकाणी मदत पोहचवणे अत्यंत अवघड असल्यामुळे इकडच्या भागात कुठलीही मदत पोहचलेली नव्हती .सहा ऑगस्टला सकाळी मोरेवाडी गावांतील जमीन अचानक खचायला सुरुवात झाली आणि खूप मोठी भेग पडून जिथे गांव वसलेला होता तो सगळा भूखंडच सरकला . भेग पडलेली लवकर लक्षात आल्यामुळे लोकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून भर पावसात संपुर्ण गाव आणि गुरे शेजारी असलेल्यां गावातील दोन मोकळ्या घरामध्ये स्थलांतरीत केले .आता सध्या हें सगळे ग्रामस्थ इथल्या या दोन घरांमध्ये एकत्र रहात आहेत .एकाच ठिकाणी स्वयंपाक करून जेवत आहेत . सध्या त्यांना कुठलाही स्वतःचा निवारा नाही , गुरांसाठी गोठा नाही . आम्हांला या गावाची माहिती आमची
जी टीम पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे त्यातल्या प्रा .अमृत साळुंखे सातारा यांनी कळवली होती .याच भागात उमा नीरज साळुंखे( सरकारी अधिकारी )यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून कामं केलेले असल्यामुळे त्यांना इथल्या सगळ्यां गोष्टीचे तपशील माहीत आहेत बारकावे माहीत आहेत .त्यांनी या कामांचे नियोजन अत्यंत नेटके आणि अचूक केले त्यामुळे बराच वेळ वाचला आणि गरजू लोकांपर्यंत पोहचता आले , योग्य नेटवर्क उभा राहीले , त्यांची खूप मोलाची मदत आम्हांला झाली .त्यांनी प्रशिक्षित (ट्रेन) केलेल्या अंगणवाडी सेविका श्रीमती जनाबाई या मोरेवाडी इथेच काम करतात .त्यांनीही आम्हांला गावाची संपुर्ण माहिती सांगितली .
इथली लोकसंख्या , स्त्री -पुरुष संख्या ,मुलांची संख्या ,गर्भवती स्त्रीया , स्तनपान सुरु असलेल्या स्त्रीयां, आरोग्य अशी सगळी माहिती त्यांनी दिली . स्वतः उमा साळुंखे म्याडम , यशवंतराव चव्हाण महाविदयालयाच्याurcd class च्या class teacher मनीषा शिरोडकर म्याडम , संपदा म्याडम आणि त्यांचे विद्यार्थी आमच्या बरोबर मदत करण्यासाठी मुद्दामहून वेळ काढून इथपर्यंत आले होते . श्रीमती जनाबाई या सेविका सुध्दा पूर्ण वेळ आमच्या बरोबर होत्या .तिथल्या शाळेचे शिक्षक श्रीयुत जाधव सर यांनी अत्यंत प्रेमाने विद्यार्थ्यांची संपुर्ण माहिती दिली .विद्यार्थ्यांचे वय , वजन ,लसीकरण आणि संपुर्ण माहिती त्यांना तोंड पाठ होती ज्यामुळे औषधे देण्यास आम्हांला खूप महत्वाची मदत झाली . आम्ही गावाला जी मदत बरोबर घेतली होती ते सगळे सामान आणि विद्यार्थी असा एक टेम्पो आम्ही तिथे घेऊन गेलो होतो . आम्ही निसर्ग जागर प्रतिष्ठान तर्फे या गावाला एक महिना पूरेल एवढे सगळे किराणा सामान पोहचवले आहे .तसेंच उघड्यावर आणि उंचावर सध्या रहात असल्या मुळे ब्लँकेटस , चादरी बेडशीटस , स्वेटर्स , जर्किन्स , लहान मुलांचे कपडे , साड्या आणि जीन्स असे साहित्य पुरवले आहे . सगळे कपडे नवीन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे .स्त्रीयांसाठी नवीन अंडर गारमेंटस , sanitory napkins पुरवले आहेत . त्यासाठी खास त्यांना आम्ही तिथे ट्रेन केले आणि त्यांची मानसिक तयारी केली .तसेंच सगळ्यां ग्रामस्थांचे चेकअप करून त्यांना आवश्यक ती औषधे आम्ही दिली . त्यात दोन जणांना डेंग्यू झालेला होता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांना सरकारी रुग्णालयात सध्या दाखल केलेले आहे. त्यांच घरातील छोटया मुलीला चेक अप केले असता तिच्या मधे सुध्दा डेंग्यूची लक्षणे दिसल्यामुळे तीला तातडीने आम्ही शिफ्ट करायला मदत केली . मोरेवाडी हे गाव पूर्ण खचले आहे.तिथे पडलेली भेग भूकंपासारखीच आहे . संपुर्ण जमीन काही फुट खचली आहे. आता सध्या लोकं जरी इथे एकत्र रहात असले तरी त्यांचे आरोग्याचे आणि निवाऱ्याचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत .एकाच हॉल मधे महिला आणि छोटे मुलं झोपत आहेत .दुसऱ्या हॉलमधे पुरुष झोपत आहेत .त्यामुळे आजार पण लवकर पसरत आहे . काहीजण तर उघड्यावरच झोपत आहेत .सर्प दंशाचे प्रमाण इथे जास्त आहे . ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोकांना सर्दी ताप खोकला झालेला होता.तर सगळीच छोटी मुलं आजारी होती .शक्य तेवढे सगळ्यांना औषधे मिळतील अशी काळजी आम्ही घेतली आहे आणि आणखीन आजार पण वाढले तर तातडीने शहरांत जाऊन तपासणी करण्याचा सल्ला त्यांना दिला आहे .गुराची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न मोठा आहे .सध्या गावात जिथे जमेल तिथे गुरे बांधून ठेवत आहेत .दिवसभर बायका आणि पुरुष गुरे घेऊन जिथे जमीन खचली आहे तिथल्या त्यांच्या शेतात आणि आजूबाजूच्या भागात चरायला घेऊन जातात कारण त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही .त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा ही जमीन संपुर्णपणे खाली खचन्याची आणि काही तरी अघटीत घडण्याची भीती कायम आहे . परंतु तरीही या भीतीच्या सावटाखाली असूनही लोकं स्वतःला सावरत आहेत .एकमेकांच्या मदतीने हें संकट सुकर करण्याचा प्रयत्न करत आहेत .सरकारने त्यांच्या गावा जवळच असलेल्या तीन एक्कर जमिनीवर गाव नव्याने वसवून द्यावे आणि जनावरांसाठी गोठा बांधून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे .आधी सरकारने लगेच करून देऊ म्हणून कळवले होते , संबधित अधिकाऱ्यांनीही तुम्हांला तातडीने मदत मिळेल असे म्हटले होते परंतु कुठलीही ठोस मदत सरकारने इथे केलेली नाही की गाव पुन्हा वसवण्यासाठीची प्रक्रीया इथे सुरु झालेली नाही .आम्ही तिथे सगळ्यां ग्रामस्थांसोबत जो संवाद साधला त्यात त्यांचा एवढाच प्रश्न होता की , ताई आम्ही आता काय करायचे? आणि कुठे रहायचे ?
खरंच माझ्याकडे या प्रश्नांचे उत्तर नाही . परंतु त्यांना गाव वसवण्यासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करायची असा निर्धार निसर्ग जागर तर्फे मी आणि आमच्या संपुर्ण टीम ने केला आहे . त्यासाठीचे दिर्घ कालीन कामाचे नियोजन आता आम्ही करत आहोत . दूसरे गांव बेंडवाडी हेही सातारा तालुक्यातील शेंद्रे गावापासून 12किमी अंतरावर आहे , अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम भागात वसलेले आहे . इथेही भूस्खलन झाल्या मुळे संपुर्ण गांव स्थलांतरीत होवून शेजारच्या माळरानावर रहात आहे . उघड्यावरच इथे लोकं रहात आहेत . याही गावाला कुठलीही मदत मिळालेली नाही .शासनाने फ़क्त आढावा घेतला आहे त्यांनंतर काहीही हालचाल झालेली नाही . लोकं त्रस्त आहेत , आजारी आहेत मदतीच्या प्रतीक्षेत आहेत . आम्ही तिथे मदत पोहचवली आहे . तसेंच पुण्याहून शिवस्फुर्ती प्रतिष्ठान आणि वारसा फौंडेशन तर्फे शैलेजा ताई मोळक आणि प्राची ताई दूधाने यांनी एक महिना पूरेल एवढी मदत स्वतः जाऊन पोहचवली आहें . आपण सर्वानी महाराष्ट्रात आलेल्या महापूरा मधे आत्तापर्यंत अत्यंत संवेदनशीलतेने मदत केली आहे .सगळ्यांच्या मदतीमुळे हजारो लोकांपर्यंत गावागावातून मदत घेऊन गाड्या येत होत्या आणि येत आहेत .आजपर्यंत सांगली , सातारा आणि कोल्हापूर येथे आणि त्या भोवतीच्या काही गावा पर्यंत ही मदत पोहचली कारण तिथे पोहचता येत होते . परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूला सांगली आणि कोल्हापूर यांच्या बॉर्डर वरती असलेल्यां 43 गावांना आणि तिन्ही जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांना मात्र कुठलीच मदत पोहचलेली नव्हती .सर्वात प्रथम शिरोळ तालुक्यातील हेरवड गावातील शिवाजी माळी या मुलाने आम्हांला तिथली परिस्थिती कळवली . तिथली घर आठ दिवसानंतरही पाण्यात आहेत असे कळवले होते . या भागात पाणी खूप जास्त होते त्यामुळे त्यांनी कळवलेल्या तेरा गावा मधे कुठलीच मदत पोहचलेली नव्हती .त्यांनी अगदी कळकळीने आम्हांला मदत करा अशी विनंती केली होती .आम्ही सर्वात प्रथम शिरोळ तालुक्यातील हेरवड , अब्दुलाट या गावी मदत केली .त्यानंतर आम्ही आमची मदत तर पोहचवलीच परंतु आमच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्यां काही संस्था आणि कार्यकर्त्यां ज्या मदत गोळा करून दुसरीकडे पोहचवत होत्या त्यांनाही आवर्जून कळवले की इकडे प्राधान्याने मदत करा म्हणून . त्यांनी ही त्यांच्या मदतीतून शिरोळ तालुक्यातील या गावांना जास्तीत जास्त मदत पोहचवली .शिवस्फुर्ती प्रतिष्ठानच्या शैलेजा ताई मोळक आणि वारसा फौंडेशनच्या प्राची ताई दूधाने यांनी स्वतः जावून या गावामध्ये मदत पोहचवली .लेखिका दीपा देशमुख यांनी स्वतःमदत केली आणि ईतर जणांकडून मदत गोळा करून तिही पाठवली आणि पुन्हा तातडीने funds उभा करण्याकरिता महत्वाची मदत केली . त्यानंतर आम्ही घालवड या गावी मदत पोहचवली तिथे डॉ .चंद्रशेखर धुमाळ यांनी आरोग्य तपासणी करून औषधे दिली .आत्ता पर्यत आमच्या सर्वाच्या मित्र मैत्रिणींनी या महापूराच्या कामात खूप मदत केली आहे त्यांनी दिलेल्या मदतीने आणि उभे केलेल्या निधी तून आम्ही मागच्या चार आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी (जिथे मदत पोहचली नाही अश्या ठिकाणी )पोहचलो आणि मदत करू शकलो याचे समाधान आहे . सगळ्यां मित्र मैत्रिणींचे त्यासाठी मनापासून आभार .यांमधे डॉ .इरा गुप्ता , प्राजक्ता पाडगावकर , हेमंत पाटील सर , उज्वला आचरेकर , दर्शनी चापेकर , पल्लवी अकोलकर , आशा साठे , गीता भवसार , खोमणे सर , मकरंद सर , शर्वरी कर्वे , झोळ म्याडम , दिनेश अदलिंग , ज्योती अदलिंग , डॉ .प्राची थोरात , रंजना हांगे , डॉ .दोषी सर , नीलेश जाधव , काही बचत गटातील स्त्रीयां ज्यांनी आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून आम्हांला मदत केली , तसेंच काही शेतकरी , आमचे नातेवाईक व ईतर मित्र मैत्रिणी जे नेहमीच मदतीला तयार असतात .या सगळ्या कामात मोलाची साथ मिळाली
डॉ .सुवर्णसंध्या धुमाळ ,
डॉ .महेश गायकवाड (अध्यक्ष निसर्ग जागर प्रतिष्ठान )
डॉ .चंद्रशेखर धुमाळ ,
लेखिका दीपा देशमुख ,
प्रा .अमृत साळुंखे ,
उमा नीरज साळुंखे ,
संग्राम पाटील सर
आणि स्थानिक पातळीवर असलेली संपुर्ण तरुण मुलांची टीम जी सातत्याने फील्ड वर्क करत होती , आजही करत आहेत . त्यातले काही जन अक्षरशः आजारी पडले आहेत .या मुलांचे कितीही धन्यवाद केले तरी कमी पडतील .मला माहीत आहे हें काम म्हणजे एवढ्या मोठ्या आपत्ती समोर त्यामानाने काहीच नाही , अगदीच नगण्य आहे .परंतु छोटया छोटया कामातूनच मोठे काम उभा राहते यांवर आमचा विश्वास आहे .या सगळ्यां लोकांसमोर पुन्हा सगळा गांव आणि घरं कसे वसवायचे , पशूधन कसे सांभाळायचे , जमीन कशी कसायची असे प्रश्न उभे आहेत आणि त्यामुळे सगळे ग्रामस्थ सर्वस्व हरवल्याने अत्यंत गंभीर अश्या मानसिक धक्क्यात आहेत . आपण आत्ता पर्यत जेवढे शक्य आहे तेवढे केले परंतु आता मोठ्या कामांसाठी आपल्या सर्वाना पूढे यावे लागेल आणि आपल्या या लोकांना उभा करावे लागेल .आमचे प्रेरणास्थान मा .शरद पवार साहेब हें याही वयात या पूरग्रस्त भागात थांबून जातीने मदत करत होते त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही आजपर्यंत सामाजिक भान राखत पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक कार्य करत आलो आहोत . निसर्ग जागरच्या परिवाराने कायम अश्या सामाजिक कामामध्ये पुढाकार घेऊन स्वतःचे योगदान दिले आहे आणि पुढेही आम्ही ते देत राहू .चला हात देऊ यांत आपल्या माणसांना उभा करू यांत ! *
आपलीच,
डॉ .सुवर्णसंध्या धुमाळ जगताप
निसर्ग जागर प्रतिष्ठान
बारामती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *